चिंचवड - दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आल्याने श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पाणी शिरले होते.
चिंचवड - दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आल्याने श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पाणी शिरले होते. 
पुणे

पुणे शहरात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरामध्ये शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागांत झाडे पडण्याच्या घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सायंकाळनंतर पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला.

दरम्यान, पुढील आठ दिवस शहरात संततधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी शहरात हजेरी लावली. शुक्रवारी रात्री पावसाने आणखी जोर धरला. शहर आणि परिसरामध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले. काही भागांत रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही भागांतील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शहरात शनिवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी पाच वाजेनंतर कमी झाला. पुढील आठ दिवस शहरामध्ये संततधार पाऊस पडणार असल्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पीएमपी सेवेवर परिणाम
शहर आणि उपनगरामध्ये शनिवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम पीएमपीच्या सेवेवर झाला. पीएमपीच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT