Water Supply esakal
पुणे

Pune Rain : पावसामुळे पुणे विभागातील पाणी टंचाईला दिलासा

गणेशोत्सवाच्या काळात पडलेल्या पावसामुळे पुणे विभागातील पाणी टंचाई निवारणासाठी थोडासा फायदा झाला आहे.

प्रशांत पाटील

पुणे - गणेशोत्सवाच्या काळात पडलेल्या पावसामुळे पुणे विभागातील पाणी टंचाई निवारणासाठी थोडासा फायदा झाला आहे. या पावसामुळे गेल्या दहा दिवसांत विभागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या ५० ने कमी झाली आहे.

सध्या पुणे विभागात १५६ टँकर्स सुरु असून, या टँकरद्वारे विभागातील १४५ गावे आणि ८८७ वाड्या-वस्त्यांना २ लाख ६० हजार ९१३ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

पुणे विभागात यंदा भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकर्सने द्विशतक पूर्ण केले होते. यानुसार २० सप्टेंबरपर्यंत २०० टँकरद्वारे विभागातील १७५ गावे आणि १ हजार ११४ वाड्या-वस्त्यांना २०० टॅँकर्सद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत त्यात आणखी सहा टँकर्सची भर पडली होती.

मात्र त्यानंतर विभागातील अनेक गावांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे गेल्या दहा दिवसाच्या काळात टँकर्सची संख्या ही ५० ने कमी झाली असल्याचे उघड झाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने दररोज विभागातील सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, यंदाच्या भर उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यात पुणे विभागात केवळ ३९ टँकर सुरु होते. या टँकरद्वारे विभागातील ४५ गावे १८९ वाड्या-वस्त्यांमधील ६५१ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाळा सुरु होताच, ही संख्या पूर्णपणे कमी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. ती अटकळ यंदा भर पावसाळ्यात फोल ठरली होती.

सद्यःस्थितीत पुणे विभागातील एकूण २ लाख ६० हजार ९१३ लोकसंख्येला आणि १ लाख १६ हजार ४७७ पशुधनाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता.

साताऱ्यात सर्वाधिक टँकर

दरम्यान, पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात यंदा पहिल्यापासून (उन्हाळ्यापासून) आजअखेरपर्यंत सर्वाधिक टँकर सुरू आहेत. यानुसार आजही या जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टँकर्स सुरु आहेत. सातारा जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ३७ टँकर सुरु असून, कोल्हापूर जिल्हा मात्र यंदा पहिल्यापासूनच कायम टँकरमुक्त राहिला असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT