Railway
Railway 
पुणे

रेल्वेगाड्या धावताहेत आता ‘राइट टाइम’

सकाळ वृत्तसेवा

पुणे  - पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या व लोकलच्या वेळेत सुधारणा झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लोणावळा ते चिंचवडदरम्यान ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण केल्याने हा बदल झाला. उर्वरित पिंपरी ते शिवाजीनगरदरम्यानचे काम सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेचा प्रवास अधिक जलद होणार आहे.  

पुणे ते लोणावळादरम्यान पूर्वी ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा सुरू नव्हती. त्यामुळे एका स्थानकावरून गाडी पुढे गेल्यानंतर काही वेळाने दुसरी गाडी पुढे जात असे. ऑटोमॅटिक सिग्नलमुळे ही अडचण दूर झाली आहे. रेल्वे प्रशासनाने चिंचवड ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गावर प्रत्येक एक किलोमीटरवर ही नवी यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे एक्‍स्प्रेस, मालगाडी, लोकल यांना कोणत्याही सिग्नलला थांबावे लागत नसल्याने गाड्या ‘राइट टाइम’ धावत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वे वाहतुकीचा भार वाढल्याने लोहमार्गावरील ताणदेखील वाढला आहे. नवीन यंत्रणेमुळे हा ताण कमी होईल. लोणावळा ते चिंचवडदरम्यानचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावर गाड्या वेळेत येत आहेत. मात्र, उर्वरित काम प्रशासनाने लवकर पूर्ण केल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होणार असल्याचे दिनेश भोसले या प्रवाशाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT