rain Pune Weather department next two days rain predicts monsoon esakal
पुणे

Pune Rain News : पुणे जिल्ह्यात पावसाची पुन्हा उघडीप; पुढील दोन दिवस स्थिती अशीच राहील हवामान खात्याचा अंदाज

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह संपुर्ण जिल्ह्यातच पावसाने उघडीप दिल्याने ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. शहरात दिवसभर फक्त ढगाळ हवामान होते. जिल्ह्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस हवामानाची स्थिती अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मागील आठवड्यात सक्रीय झालेला मॉन्सून आता काहीसा कमी पडला आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडीप असून, दिवसभर कडक उन्हाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे.

पुण्यासारखी राज्यातही अशीच स्थिती असून, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाने उघडीप घेतली आहे. मंगळवारी (ता. १२) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा, गुना, सागर, पेंद्रारोड, बालासोर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

वायव्य मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

गुरूवारपासून पाऊस वाढण्याचे संकेत

उत्तर अंदमान समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची प्रणाली पूर्व -मध्य बंगालच्या उपसागरात मनारच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत कायम आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. १४) या भागात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यातील पावसाची उघडीप आणखी दोन दिवस राहणार असून, गुरुवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने शुक्रवारपासून (ता. १५) राज्याच्या अनेक भागात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : डीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT