Pune Rain News esakal
पुणे

Pune Rain News : पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं; वाहतूक कोंडी अन् वीजही गेली

संतोष कानडे

पुणेः राज्यात परवापासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.

पुण्यातल्या वडगाव धायरी येथे विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस तसेच वडगाव धायरीमध्ये वीज गेली आहे. रामटेकडी, वैदूवाडी भागात विजेच्या प्रचंड गडगडाटासह जोरात पाऊस सुरू झाला आहे. मुंढवा, केशवनगर, खराडी भागामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालीय.

पुण्यातल्या घोरपडी परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरू झाला असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झालीय. शिवाय तळजई भागात गारपीट झाल्याची माहिती आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, गारा आणि वादळी वाऱ्यासह आज अवकाळी पाऊस होऊ शकतो. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Interest Update : होळीला कोट्यवधी भारतीयांना मिळणार खुशखबर ! PF वर मिळणार तब्बल 'इतके' व्याज, CBT बैठकीत मोठा निर्णय ?

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

SCROLL FOR NEXT