Rain pune sakal
पुणे

Rain: पावसामुळे आनंद पार्क सोसायटीची भिंत कोसळली

या जागेत सोसायटीची एक एकर मोकळी जागा आहे. आणि या मोकळ्या जागेत त्यांनी उद्यान उभारले आहे.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट- जोरदार वाऱ्याचा झोत त्यात मुसळधार पाऊस अचानक आल्याने शंकर शेठ रोड वरील आनंद पार्क सोसायटीची भिंत कोसळली आहे. यावेळी आनंद पार्क सोसायटीच्या शेजारील मॅजेस्टिक लँडमार्कस् बिल्डरचे बांधकाम सुरू आहे आहे.

यावेळी बिल्डर कडून सोसायटीच्या भिंतीलगत विना फाउंडेशन लोखंडी खांब व पत्रे उभारण्यात आले होते. हे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने वाऱ्याच्या झोताने सोसायटीच्या आतील परिसरात हे पत्रे व खांब भिंतीवर जोरदारपणे कोसळले. त्यामुळे सोसायटीची 100 फुटाची संरक्षण भिंत कोसळली.

या जागेत सोसायटीची एक एकर मोकळी जागा आहे. आणि या मोकळ्या जागेत त्यांनी उद्यान उभारले आहे. या उद्यानात व मोकळ्या जागेत सतत लहान मुले खेळत असतात.

बिल्डरच्या या चुकीच्या कामामुळे सोसायटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची शक्यता सोसायटीतील रहिवासी सागर मुनोत यांनी वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता मुख्याध्यापकांचीच ‘परीक्षा’; शिक्षण संचालकांनी तातडीने मागविली माहिती, शाळांमध्ये नसलेल्या बाबींची उत्तरेही ‘हो’मध्येच

Sports Success Story: जिद्दीने गाठला ‘एशियन गेम्स’चा टप्पा; सुदेष्णा शिवणकरची कामगिरी; जपानच्या स्पर्धेतही वाजावा डंका

आजचे राशिभविष्य - 01 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : भिंत खचली, चूल विझली

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा पालकापासून हा स्वादिष्ट पदार्थ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT