pune rain updates 
पुणे

पुण्यात पावसाची कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार हजेरी

सकाळ डिजिटल टीम

पुणे - मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील काही भागात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानं रविवारी दुपार पासून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुण्यातही काही भागात जोरदार तर काही ठिकाणी पावसाचा तुरळक शिडकावा झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. यामध्ये खडकवासला, उत्तमनगर, बाणेर, बालेवाडी, बिबवेवाडी इथं तुरळक पाऊस झाला. तर सिंहगड रस्त्यावर मुसळधार पाऊस झाला. सातारा रस्ता, सहकारनगर अरण्येश्वर परिसरातही हलक्या सरी पडल्या. 

दरम्यान, अचानक आलेल्या अवकाळी आणि वादळी पावसाने पिकांचंही नुकसान झालं आहे. आंबेगाव जुन्नर परिसरात गारपीटसुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आंबा बागेसह इतर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चारच दिवसांपूर्वी हवामान विभागाने शनिवारपासून पावसाची शक्यता वर्तवली होती. कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले होते. समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रीय स्थितीचं क्षेत्र तयार झालं होतं. याची तीव्रता वाढल्यानं महाराष्ट्रात विदर्भातील काही भागात पाऊसही झाला. हवामान बदलामुळे हा पाऊस पडत असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

राज्यातील अनेक भागात यामुळे ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसात विदर्भात वर्धा जिल्ह्यात तर नागपूरमध्ये पूर्व मोसमी पाऊस झाला. याशिवाय रविवारी मध्य महाराष्ट्रासह इतरत्र पावसाचं वातावरण झालं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT