RainFall-Pune-Rain 
पुणे

पुढील 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी पडणार आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत सकाळपासून उन्हाचा चटका आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकणातही तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.१४) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ४०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली.

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम आहे. तर वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागापासून ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागात आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस

मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.

बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.

गुरूवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

शुक्रवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

सोमवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (सांताक्रुझ) ३२.६

अलिबाग - ३१.५

रत्नागिरी - २८.९

डहाणू - ३३.२

पुणे - ३१.६

जळगाव - ४०.०

कोल्हापूर - २९.०

महाबळेश्वर - २१.१

नाशिक - ३२.२

सांगली - ३०.३

सातारा - ३०.०

सोलापूर - ३३.४

उस्मानाबाद -- ३१.२

औरंगाबाद - ३५.३

परभणी - ३३.७

नांदेड - ३९.०

अकोला - ३७.०

अमरावती - ३४.४

बुलडाणा - ३३.०

ब्रम्हपुरी - ३५.६

चंद्रपूर - ३१.०

गोंदिया - ३७.२

नागपूर - ३६.२

वर्धा - ३६.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Miscarriage Causes: सतत गर्भपात का होतो? मग डॉक्टरांकडून जाणून घ्या याची कारणे, लक्षणे आणि उपाय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पाडव्याच्या रात्री निघाली रेड्यांची मिरवणूक

Tiger Group Viral Vieo : किंग नाही किंगेमेकर... टायगर ग्रुपचे मुंबई पोलिसांनाच आव्हान ? कारच्या टपावरील हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT