पुणे

पावसाबाबत सप्टेंबरचा पहिला आठवडा निराशाजनकच

CD

पावसाबाबत सप्टेंबरचा
पहिला आठवडा निराशाजनकच

मराठवाड्यातील २४ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नाही

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी २४ तालुक्यांत जून ते सप्टेंबरदरम्यान पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस पडला नसल्याची स्थिती आहे. यामध्ये बीडमधील ६, लातूरमधील ८, धाराशिवमधील ४, परभणीतील ५ व हिंगोलीतील एका तालुक्याचा समावेश आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही एकापाठोपाठ एक दिवस कोरडा जात असल्याने खरिपाची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.
हलक्या, मध्यम जमिनीतील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेले आणि सर्वाधिक पेरणी झालेले सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात करपून गेले आहे. वाढीच्या अवस्थेत पिकांना पाणी न मिळाल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनसह बाजरी, कपाशी, मका, मूग, उडीद करपून गेले असून, करपून जात असलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हातचा गेल्यात जमा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रताही वाढल्याने पिकांच्या नुकसानीत भर पडत आहे.
सप्टेंबरच्या सरासरी पावसाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.२ टक्के, जालन्यात १५.४ टक्के, बीडमध्ये २४.४ टक्के, लातूरमध्ये १४ टक्के, धाराशिवमध्ये ३.७ टक्के, नांदेडमध्ये १५.४ टक्के, तर परभणीत ४.३ टक्के व हिंगोलीत १०.८ टक्केच पाऊस झाला आहे.
गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत मराठवाड्यात सरासरी ६०३.६ मिलिमीटर म्हणजे सरासरी पावसाच्या तुलनेत १०९.३ टक्के पाऊस झाला होता. जून ते सप्टेंबरदरम्यानच्या सरासरी पावसाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६८.३ टक्के, जालन्यात ६८ टक्के, बीडमध्ये ५२.१ टक्के, लातूरमध्ये ४३.९ टक्के, धाराशिवमध्ये ५०.७ टक्के, नांदेडमध्ये ६४.२ टक्के, परभणीत ४७.५ टक्के, तर हिंगोलीत सरासरी पावसाच्या तुलनेत ६१.३ टक्के पाऊस झाला आहे.


सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांच्या आत पाऊस झालेले तालुके
बीड जिल्हा
बीड, आष्टी, गेवराई, वडवणी, शिरूर कासार, माजलगाव.

लातूर जिल्हा
लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, रेनापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ.

धाराशिव जिल्हा
धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा.

परभणी जिल्हा
परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ, मानवत.

हिंगोली जिल्हा
बसमत.

जिल्हानिहाय प्रत्यक्ष पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर — ३९७.३
जालना — ४१०.४
बीड — २९४.८
लातूर — ३९९
धाराशिव — ३०५.५
नांदेड — ५२३.२
परभणी — ३६१.९
हिंगोली — ४८७.९

जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर — ५८१.७
जालना — ६०३.१
बीड — ५६६.१
लातूर — ७०६
धाराशिव — ६०३.१
नांदेड — ८१४.४
परभणी — ७६१.३
हिंगोली — ७९५.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT