पुणे

आळेफाटा येथे पावसामुळे पिकांना फटका

CD

आळेफाटा, ता.६ : आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील वडगाव आनंद येथे बुधवारी (ता.५) सायंकाळी चारच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस पडला. यामुळे शेत जमिनीसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

पावसामुळे शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत तर उन्हाळी भुईमूग, बाजरी, तरकारी पिके, टोमॅटो या पिकांबरोबर आंबा, डाळिंब, या फळ बागांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, वडगाव येथील‌ सुदाम महादू वाळूंज यांची बाजरी काटून शेतात ठेवली होती. पण अचानक झालेल्या ढगफुटीमुळे सुमारे दहा पोती बाजरी धान्य होईल तेवढी कणसे पाण्यात वाहून गेली तर याच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरीच्या पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा तलाठी अन्वर शेख, कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केला आहे.

ढगफुटी सदृश पावसामुळे आमचे मोठे नुकसान झाले. गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला. वडगाव आनंद परिसरात बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात बाजरीची कणसे होती. ती पूर्णपणे पाण्याने वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
-सुदाम वाळूंज, शेतकरी


04714

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT