पुणे

पुणे : पावसाने लावली हजेरी अन् बटाटा पिक...

जयदीप हिरवे

सातगाव पठार : सातगाव पठार ता.आंबेगाव भागात काल दुपारी एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावली व त्यानंतरही रात्री उशीरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे या भागातील सात गावांतील हजारो एकर शेतीक्षेत्रावरील बटाटा पिकास जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेले चिंतेचे सावट दूर झाले आहे.

सातगाव पठार हा भाग बटाट्याचे आगार म्हणून ओळखला जातो. खरीप हंगामात बटाटा पिकाची सर्वाधिक लागवड या भागात केली जाते. सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित हे बटाटा पिकावरच अवलंबून असते. शेतकरी खरीप हंगामात बटाटा पिकासाठी लाखो रूपये गुंतवत असतात. बटाटा पिकासाठी वेळोवळी पावसाची आवश्यकता असते. यंदा सुमारे 6 ते 7 हजार एकर शेतीक्षेत्रावर बटाटा पिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. सुरवातील लागवडीदरम्यान अगदीच जेमतेम पाऊस झाला होता. त्यामुळे लागवड उशिरा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी झालेल्या जेमतेम पावसाच्या भरवशावरच बटाट्याची लागवड केली. मात्र, त्यांनतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भागातील बटाटा पिक पावसाच्या पाण्यावरच येत असते. त्यामुळे लागवडीनंतर पावसाची नितांत आवश्यकता होती. काल चांगला पाऊस झाल्याने या भागातील बटाटा पिकासह इतरही पिकांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पाऊस नसल्याने तुषार सिंचनाव्दारे पिकास पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू केले होते. मात्र, वेळेतच पाऊस झाल्याने बटाट्याबरोबरच भुईमूग, फरशी, वटाणा आदी पिके आता जोमात येणार असल्याने शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर असलेले चिंतेचे सारे सावटच आता दूर झाले असून, शेतकरी लगेचच पिकांवर औषधांची फवारणी करण्यास सरसावला आहे.

पावसामुळे जीवदान

जर योग्यवेळी पाऊस झाला नाही तर बटाटा पिकास धोका पोचून शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचेच आर्थिक गणित बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे आता पाऊस झाल्याने बटाटा पिकास जीवदानच मिळाले असल्याचे भावडी ता.आंबेगाव येथील बटाटा उत्पादक शेतकरी रोहीदास चक्कर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT