Nilesh Mazire Resigns MNS Sakal
पुणे

सभेआधीच पुण्यात मनसेला धक्का; वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची २२ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे.

दत्ता लवांडे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची २२ मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. या सभेआधीच मनसेला गळती लागणार असल्याचं कळतंय. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे मनसे सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

(Nilesh Mazire Resigns MNS)

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझीरे यांची ओळख आहे. ते पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली आहे.

निलेश माझीरे हे पक्षांतर्गत गटबाजी आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची भेट घेतली असून ते दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने मनसेत खळबळ उडाली आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी तब्येतीच्या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर ते आता पुण्यात २२ मे रोजी सभा घेणार आहेत. त्याआधीच कट्टर कार्यकर्ते सचिन माझीरे मनसेला रामराम ठोकणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राज ठाकरे हे ५ जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार होते पण त्यांनी आयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. त्यानंतर पुण्यातील रविवारच्या सभेत आयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे काय स्पष्टीकरण देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एकदम मिळणार ६००० रुपये; ई-केवायसी, दुरुस्ती, संशयित लाभार्थींची पडताळणी सुरू; सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Valentine's Day 2026 Special Recipe: जर तुम्हीही कॅन्डललाइट डिनरचा प्लॅन करत असाल तर 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT