Raj Thackeray esakal
पुणे

Raj Thackeray: "सत्तेमध्ये सौंदर्यदृष्टी असायला लागते तेव्हाच शहरं सुंदर दिसतात"; राज ठाकरेंचं परखड भाष्य

जागतिक आर्किटेक्टदिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी टाऊनप्लॅनिंगवर महत्वाचं भाष्य केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : सत्तेमध्ये सौंदर्यदृष्टी असायला पाहिजे, तेव्हाच शहरं सुंदर दिसतात असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. जागतिक आर्किटेक्टदिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. (Raj Thackeray Pune Interview an International Architect day Power must have aesthetic vision says Raj Thackeray)

राज ठाकरे म्हणाले, "शहरं सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, तरच ती खाली उतरते. नाहीतर तुम्ही खाली कितीही टाहो फोडा, त्याचा काहीही उपयोग नाही. महापालिकेत टाऊन प्लॅनिंगमध्ये इंजिनिअरला महत्व आहे पण आर्किटेक्टला नाही.

आपल्याकडं सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे, त्याकडं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. आपल्याकडं रस्ते बांधले जातात पण कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायला हवेत याचा विचार केला जात नाही. फक्त आहेत पैसे म्हणून रस्ते बांधले जातात.

...तर जगण्याला अर्थ आहे

मी एका चांगल्या शहरात जगतो आहे असं जर मला वाटलं तर त्या जगण्याला अर्थ आहे. कारण तुम्ही रस्त्यानं जात असताना खड्ड्यात पाय पडतो, पाय मुरगळतोय, फुटपाथ नीट मिळत नाहीत, आणकी काय काय होतं. (Latest Marathi News)

याला जगणं म्हणत नाही तुमचा जन्म झालाय म्हणून जगता. अनेक तरुण-तरुणी म्हणतात की आम्हाला परदेशात जायचंय, पण काय जायचंय? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय पण सभोवलातलंच वातावरण त्यांना मिळत नाही. (Marathi Tajya Batmya)

तर पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही

मी गेले २५ एक वर्षे पुण्यात येतोय. पुण्यात ही गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणातून सांगितली आहे. मुंबई बरबाद व्हायला एक काळ गेला. पुणं बरबाद व्हायला वेळचं लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे. पाच पाच पुणे आहेत.

एक हिंजवडीचं वेगळं, नदीकाठचं वेगळं, विमाननगरचं वेगळं असं पुणं झालं आहे. पुणं म्हणून कुठं राहिलंय याचा कारण राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष. त्यांना हे कळलं पाहिजे की टाऊन प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT