पुणे

Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'

विनायक बेदरकर

कोथरूड (पुणे) : कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटलेले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कोथरूडमध्ये दाखल होत आहे.

कोथरूड भागातील भेलके नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मंगळवारपासूनच राज ठाकरे प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. बुधवारी पुणे शहरामध्ये राज ठाकरे त्यांच्या दोन प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वीच कोथरूडमध्ये ठाकरे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधक मनसे उमेदवाराच्या पाठिशी उभे ठाकले असताना राज ठाकरे हे मंगळवारपासूनच कोथरूडच्या प्रचारात उतरून निवडणुकीत रंगत आणणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिन्याभरात सोनं १८ हजारांनी, चांदी ६२ हजारांनी स्वस्त! लग्नसराईत खरेदीची हीच योग्य वेळ?

Pune Investment Fraud : जादा परताव्याच्या आमिषाने पुण्यात गुंतवणूकदारांची १ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक, वानवडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Alephata News : चारा टंचाईच्या भीतीने पशुपालक चिंतेत! आळेफाटा उपबाजारात ४२५ गाईंची आवक; ८४ लाखांची उलाढाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक; थेट राहुल गांधींना दिला जाणार रिपोर्ट

भारतीय विद्यार्थ्यांना जपानचे बोलावणे! 6 महिन्यांची पेड रिसर्च इंटर्नशिप; असा करा ऑनलाइन अर्ज...

SCROLL FOR NEXT