NRK26A00590
नरखेड ः राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व्याख्यानाचे उद्घाटन करताना. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व विविध मान्यवर.
जिजाऊंनी वैभवशाली इतिहास शिकवल्यानेच स्वराज्यनिर्मिती : कोकाटे
नरखेड येथे नवोदय विचारमंचच्यावतीने व्याख्यान
नरखेड, ता. १७ ः राजमाता जिजाऊंनी शिवरायांना बहुजनांचा वैभवशाली इतिहास सांगितला. जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्ने पाहिली. बाल शिवाजीच्या मनात स्वराज्यचे बिजरोपण करीत बालशिवबाला घडवले. त्यामुळेच राजमाता जिजाऊ आजच्या स्त्रीसाठी आदर्श आहेत, असे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी नरखेड (ता.मोहोळ) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान प्रसंगी केले.
जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवली आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्र पुरोगामी बनला. जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी बनला. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांनी महाराष्ट्रावर अन्याय-अत्याचार केले. त्या काळात राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहून शिवाजी महाराज घडवले आणि सामान्यांना न्याय मिळवून दिला. जिजाऊंनी अंधश्रद्धांना विरोध केला, तर सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या दोन रणरागिणींमुळेच समाज परिवर्तनाची दिशा ठरली. मुली व महिलांनी रूढी-परंपरांच्या मागे न लागता, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, शिक्षणालाच सर्वाधिक महत्त्व द्यावे आणि अन्यायाविरोधात उभे राहावे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
नरखेड येथे नवोदय सामाजिक विचारमंचच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती महोत्सवानिमित्त इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंत पाटील होते.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच बाळासाहेब मोटे, माजी सरपंच विनोद पाटील, डॉ. उमेश मेंडगुळे, सुधाकर काशीद, बाळासाहेब चौधरी, राजेंद्र मोटे, अशोक धोत्रे नागरिक उपस्थित होते.
अग्नीवीरांचा केला सान्मान
भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड झाल्याबद्दल संकेत शहाजी गरड, सूरज श्रीराम धोत्रे, प्रज्वल नेताजी उबाळे यांचा तसेच माधुरी दिलीप धोत्रे (नगरसेविका पंढरपूर), आशा सोमेश यावलकर (नगरसेविका सांगोला), महेश प्रभाकर भोरे (अध्यक्ष राज्य आरोग्य विस्तार अधिकारी संघटना) यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.