Rajan kamble and hanumant nalawade Missed Opportunity to contest vidhansabha election 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही पार्किंगला जागा न मिळाल्याने हुकली संधी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : विधानसभा निवडणूक लढवायचा निर्धार करून सर्व तयारी केली, पक्षाने एबी फाॅर्म पण दिला, पण निवडणूक कार्यालयाजवळ गाडी लावायला पार्किंग लवकर न मिळाल्याने पाच मिनीट उशीर झाला, अन् विधानसभा निवडणूक लढण्याची संधीच गमावली. तर दुसऱ्या उमेदवाराला तीन मिनिटे उशीर झाल्याने अर्ज न भरता माघारी जावे लागले. ही घटना घडली रिपाईचे (कांबळे गट) राजन कांबळे आणि आंबेडकर राईट्स पार्टी आॅफ इंडिया या पक्षाचे उमेदवार हनुमंत नलावडे यांच्या सोबत. 

नलावडे हे पुण्यातील नुमवी शाळेत शिक्षक आहेत, ते शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढणार होते, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, नलावडे हे तीन वाजून तीन मिनीटांनी घोले रस्त्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या गेटवर येऊन त्यांची दुचाकी आत घातली. पण पोलिसांनी त्यांना अडवले. तुम्हाला पुढे जाता येणार नाही असे सांगितले. यावरून नलावडे व पोलिसांंमध्ये यावरून शाब्दिक वाद झाला. अखेर, नलावडे यांना माघार घ्यावी लागली. 

नातेवाईकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो असल्याने मला उशीर झाला, पण पोलिसांनी मला बाहेर काढले. मला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊ दिले. त्यांनी माझ्या अर्जावर निर्णय घेतला असता. पोलिसांनी अरेरावी केली, असा आरोप नलावडे यांनी केला. 

राजन कांबळे हे याचवेळी गेटमध्ये आले तेव्हा नलावडे यांचा पोलिसांशी वाद सुरू होता. पोलिसांनी कांबळे यांनाही बाहेर काढले. मी खासगी नोकरी करतो. पक्षाचा एबी फाॅर्म मिळाल्यावर प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले. स्वारगेटवरून घोले रस्त्यावर आलो, पण मला गाडी लावायला लवकर पार्किंग न मिळाल्याने उशीर झाला असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT