rajarshi shahu bank pune sakal
पुणे

Rajarshi Shahu Bank : राजर्षी शाहू बँकेत आता व्हॉटसअप बॅंकिंगची सोय

राजर्षी शाहू सहकारी बॅंकेने गेल्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता ग्राहकांसाठी व्हॉटसअप बॅंकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राजर्षी शाहू सहकारी बॅंकेने गेल्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता ग्राहकांसाठी व्हॉटसअप बॅंकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉटसअप बॅँकिंगबरोबरच बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी नवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर भर दिला जाणार आहे. यासाठी बँकेच्या मुख्यालयासाठी भव्य-दिव्य व सुसज्ज असे नवीन प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे.

या प्रशासकीय भवनाचे उद्घघाटन येत्या शनिवारी (ता.१३) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते केले जाणार आहे. या भवनमुळे बँकेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आबासाहेब शिंदे यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचे बँकेचे अध्यक्ष सुधाकर पन्हाळे यांनी बुधवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुणे शहरात सर्वसामान्यांसाठी बहुजन समाजाची बॅँक असावी, असे आबासाहेब शिंदे यांचे स्वप्न होते. यानुसार त्यांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी १ जुलै १९८५ रोजी या बँकेची स्थापना केली आहे. सुरवातीला अवघे २ हजार ६६ सभासद असलेल्या या बॅंकेचे आता २३ हजार ६३३ इतके सभासद आहेत.

बँकेच्या कामगिरीची आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बॅँकेच्यावतीने आज नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पन्हाळे बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शांताराम धनकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर, दिवंगत आबासाहेब शिंदे यांचे नातू व संचालक मनन शिंदे यांच्यासह कमल व्यवहारे, डॉ. सुनील जगताप, पद्माकर पवार आदी संचालक उपस्थित होते.

पन्हाळे पुढे म्हणाले, ‘ही बॅंक सुरु करताना केवळ ४ लाख ६ हजार रुपये इतके कमी भाग भांडवल होते. ते आता २८ कोटी ८२ लाख रुपये झाले आहे. बँकेतील मुदत ठेवींनी आता १ हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून आजघडीला एकूण १ हजार ४८ कोटी ३९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

बँकेचे एकूण व्यवसाय आता १ हजार ६०० कोटींवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना कर्जाचे दोन हप्ते माफ केले जात आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT