पुणे

राजस्थानात आणखी ११ जिल्ह्यांत डिजिटल खत विक्री व्यवस्था

CD

राजस्थानात आणखी ११ जिल्ह्यांत
डिजिटल खत विक्री व्यवस्था

डीबीटी-पॉस प्रणाली लागू; तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचा विरोधकांचा आरोप

ॲग्रोवन वृत्तसेवा
जयपूर : राजस्थान सरकारने अनुदानित खतांची डिजिटल विक्री व्यवस्था आणखी ११ जिल्ह्यांत लागू केली आहे. ही व्यवस्था पारदर्शक असून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देणारी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
२७ ऑगस्टपासून बारां, दौसा, हनुमानगड, डुंगरपूर, जालोर, झालावाड, करौली, कोटा, प्रतापगड, सवाई माधोपूर आणि टोंक या ११ जिल्ह्यांत डीबीटी-पॉस प्रणाली लागू करण्यात आली आहे. यापूर्वी दोन टप्प्यांत राज्यातील सात जिल्ह्यांत ही डिजिटल खत विक्री व्यवस्था लागू करण्यात आली होती.
पहिल्या दोन टप्प्यांचे निकाल सकारात्मक आणि उत्साह वाढवणारे असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. आतापर्यंत एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रणालीद्वारे सुमारे १५ हजार टन युरियाचे बुकिंग केले आहे. डिजिटल बुकिंग प्रक्रिया सोपी, सोयीची आणि उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
राजस्थानचे कृषी आयुक्त नरेश कुमार गोयल यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना युरिया प्रति गोणी २६७ रुपये या निश्चित दराने उपलब्ध करून देते. प्रत्येक गोणीमागे सरकारकडून सुमारे १ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. दुसरीकडे, औद्योगिक दर्जाच्या युरियाची किंमत २ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त असल्याने अनुदानित युरियाचा काळाबाजार आणि अनधिकृत वापर होण्याचा धोका असल्याचा सरकारचा दावा आहे.
दरम्यान, डिजिटल व्यवस्थेवरून राजस्थानात राजकीय वादही सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेवर टीका केली आहे. तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि तासनतास लागणाऱ्या रांगा यामुळे शेतकऱ्यांना खत न मिळताच परतावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Dahi Handi Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांनी फोडली दहीहंडी; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Mhada: गिरणी कामगारांना दिलासा! 'म्हाडा'च्या घरांचे सेवाशुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT