Human Urine Melting Everest Glacier
esakal
हिमालय म्हटलं की डोळ्यासमोर बर्फाच्छादित पर्वत, उंचच उंच शिखरं आणि थंडगार वातावरण उभं राहतं. पण याच हिमालयात आता बर्फ झपाट्याने वितळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं तापमान आणि जीवाश्म इंधनाचा वापर यामुळे हिमनद्या वितळत असल्याचं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, एव्हरेस्टवरील ग्लेशियरबाबत झालेल्या एका नव्या अभ्यासात आणखी एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.