पुणे

राजस्थान निवडणुकीत भाजपची बाजी

CD

जयपूर, ता. १५ (पीटीआय) : राजस्थानमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली. या पक्षाने ४,१७९ वॉर्डांमध्ये विजय मिळविला, तर विरोधकांना ३,६१३ वॉर्डांमध्ये यश मिळाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम ज्या कोटामधून सुरू केला होता, तेथे आणि आणखी तीन महानगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले.
राजस्थानमधील दहा पैकी चार महानगरपालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून येथे या पक्षाचा महापौर निवडून येणार असल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे. काँग्रेसला बिकानेर येथे बहुमत मिळाले, तर भाजपच्या नेत्या वसुंधराराजये यांच्या झालावार जिल्ह्यातही काँग्रेसनेच बाजी मारली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनाही चांगले यश मिळाले. त्यांना एकूण २,२७३ वॉर्डांमध्ये यश मिळाले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भरतपूर जिल्ह्यातही अपक्षांनी ६५ पैकी ३६ वॉर्डांमध्ये विजय मिळविला. येथे भाजपला वीस ठिकाणी यश मिळाले. स्थानिक निवडणुकीतील या यशामुळे राजस्थानमध्ये ट्रिपल इंजिनचे सरकार आले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शर्मा यांनी दिली. तर, काँग्रेसने निकालावर टीका करताना मतदारसंघांची चुकीची फेररचना केल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्राथमिक निकालानुसार, भाजपला ४१७९, काँग्रेसला ३६१३, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला ६३, आप ४२. माकप ३८ आणि बसपला १९ जागांवर यश मिळाले. दहा महानगरपालिका, ५१ नगर परिषदा आणि २४८ नगर पालिकांसाठी ही निवडणूक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला पुन्हा धमकीचा मेल, अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख

फक्त १० रुपयांत सोनं खरेदीची संधी! धनत्रयोदशीला 'या' ६ प्लॅटफॉर्मवर मिळतायत खास ऑफर्स

Latest Marathi News Update : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, जीवाला धोका असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Diwali Padwa: नवऱ्याने बायकोला ओवाळणी देणे का गरजेचे? दिवाळी पाडव्याला भेटवस्तू न दिल्यास बसेल मोठा फटका; शास्त्र काय सांगते?

Ramayana Box Office: 'रामायण'ने करून दाखवलंच! पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये धुमाकूळ; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

SCROLL FOR NEXT