पुणे

सिझेरियननंतर महिलांसमोरील अडचणीत वाढ

CD

राजस्थानात नवमातांबाबत चिंता
शस्त्रक्रियेनंतर तब्येत ढासळली; नमुने तपासणीसाठी घेतले
जोधपूर, ता. २२ (पीटीआय) : राजस्थानमध्ये शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीनंतर मातांची प्रकृती बिघडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटा आणि बिकानेरनंतर आता जोधपूरमधील पावटा येथील रुग्णालयातही अशीच घटना समोर आली. त्यामुळे राज्य सरकारने संबंधित महिलांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ऑपरेशन थिएटर (ओटी) तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी शस्त्रक्रियांद्वारे प्रसूती झालेल्या आठ महिलांची प्रकृती बिघडली. यानंतर रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाने उपचार सुरू केलेे. रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलविंदर सिंग चोप्रा यांनी सांगितले की, २० जून रोजी आठ शस्त्रक्रिया नियोजित होत्या. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती संध्याकाळपर्यंत खालावली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित सहा महिलांना उच्च दर्जाची प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि इतर औषधे देण्यात आली. त्यांनी सांगितले की, सध्या सहाही महिला स्थिर असून त्यांची लक्षणे सामान्य आहेत. दर दोन तासांनी त्यांची तपासणी केली जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फतेह सिंग जोधा यांनी सांगितले की, या शस्त्रक्रिया शनिवारी करण्यात आल्या होत्या. खबरदारी घेतल्यानंतरही दोन महिलांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली. एका महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला, तर दुसऱ्या महिलेला शस्त्रक्रियेदरम्यान किरकोळ रक्तस्राव झाला. वरिष्ठ डॉक्टर आणि सूक्ष्मजीवशास्त्रांनी नमुने गोळा केले असून अहवालांची प्रतीक्षा आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामागे संसर्गाची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. रुग्णालय प्रशासनाने सर्व पीडित महिलांना निरीक्षणाखाली ठेवले असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
कोटा, बिकानेरला काय घडले?
मे २०२६ मध्ये कोटा येथील सरकारी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीनंतर अनेक महिलांची प्रकृती अचानक खालावली. या प्रकरणात किमान पाच महिलांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने चौकशी सुरू केली असून काही डॉक्टर व परिचारिकांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. यानंतर जूनमध्ये बिकानेर येथील पीबीएम रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीनंतर सहा महिलांना मूत्रपिंडविकार, सेप्सिस, लघुशंका न होणे, प्लेटलेट्स कमी होणे आणि अवयव निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्या. काही महिलांना आयसीयूमध्ये ठेवून डायलिसिस करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT