नारायणगाव, ता. २१ : जुन्नर तालुका महा ई सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी नारायणगाव येथील ई सेवा केंद्राचे संचालक राजेश दिनकर बाप्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संघटनेचे मावळते अध्यक्ष ॲड संजय उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व आधारकार्ड चालक यांची नारायणगाव येथे बैठक झाली. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीसाठी विकास चव्हाण, विजय पळमकर, दिलीप तांबे, नयना भोर, गणेश कांबळे, सचिन शिर्के, सलीम मुलाणी, तेजस वारुळे, गणेश दाते, रोहित जठार, सविता जाधव आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून ई सेवा केंद्राच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष बाप्ते यांनी सांगितले.
यावेळी निवड करण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : सुनील विश्वासराव व हर्षवर्धन कुऱ्हे (उपाध्यक्ष), संपत हाडवळे (सचिव), संचालक : प्रकाश काळे, अब्दुलरज्जाक सय्यद, मंदार अहिनवे, दिनेश लोहोटे, नीलम शिंदे, अशोक बोचरे, प्रवीण भालेराव, गणेश कांबळे. अजित पानसरे (मीडिया प्रसिद्धी प्रमुख)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.