पुणे

अपहरणाची खोटी माहिती; तरुणावर गुन्हा दाखल

CD

खेड शिवापूर, ता. ९ : डायल ११२ वर अपहरणाची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. राजेश वैजनाथ यादव (वय २५, सध्या रा. रहाटवडे-लेबर कॅम्प, ता. हवेली, मूळ रा. मध्यप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राजेश यादव याने डायल ११२ वर फोन करून काही इसमांनी आपले अपहरण केल्याचे सांगितले. तसेच, बँक खात्यावर रिंगरोड कंपनीकडून १७ लाख रुपये पाठवले नाहीत तर अपहरणकर्ते मारहाण करतील आणि कंपनी जाळून टाकतील, अशी माहिती त्याने दिली. या माहितीची पडताळणी केली असता ती माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, त्याच्या विरोधात शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून लोकसेवकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : धक्कादायक घटना ! पोलिसांची गाडी पाहून तरुणांनी तलावात मारल्या उड्या; तिघांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

IND vs UAE: आर्यवीर सेहवागचे वडिलांच्या पावलावर पाऊल! U19 Asia Cup मध्ये ठोकलं खणखणीत शतक

सई ताम्हणकर चवीने खाते दुधातलं पिठलं; कसं बनवतात ठाऊक आहे का? तिनेच सांगितली रेसिपी, खास टीपदेखील दिली

NASA च्या उपग्रहातून भारतातील प्रदूषणाचे भीषण चित्र; संपूर्ण गंगेच्या मैदानावर धुरक्याची चादर

Latest Marathi News Live Update: गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील तर समविचारीच्या शशिकांत पाटील चुयेकरांचा अर्ज

SCROLL FOR NEXT