पुणे

राजगडमधील पाच शाळा शंभर नंबरी

CD

वेल्हे, ता. ९ : राजगड तालुक्यातून ५२५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ५१२ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ९७.५२ टक्के लागला आहे. तालुक्यातील पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तालुक्यातून सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय रुळे येथील संस्कृती तानाजी मरगळे व पूर्वा प्रदीप निवगुंणे या दोन्ही विद्यार्थिनींना ९२.४० टक्के गुण मिळाले असून तालुक्यात त्या प्रथम आल्या आहेत.
तोरणा विद्यालय वेल्हे निकाल १०० टक्के लागला असून ७२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्वजण पास झाले. त्यांचे प्राचार्य संतोष चव्हाण यांनी अभिनंदन केले.
तोरणासागर विद्यालय निवी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेले सर्व ३४ विद्यार्थी पास झाले. त्यांचे मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सदस्य व प्राचार्य मोहन किन्हाळे यांनी अभिनंदन केले.
राजेशिवछत्रपती विद्यालय सोंडे माथना विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. २१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांचे प्राचार्य सुभाष वाल्हेकर यांनी अभिनंदन केले. दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी निकाल १०० टक्के लागला असून, १६ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. प्राचार्य संजय पगारे यांनी त्यांचे अभिनंदन केले .
सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय, रुळे निकाल १०० टक्के निकाल लागला. २५ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. सर्वच पास झाले असून तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान देखील याच विद्यालयातील मिळवला आहे. संस्कृती तानाजी मरगळे व पूर्वा प्रदीप निवगुणे या दोन्ही विद्यार्थिनींना ९२.४० टक्के गुण मिळाले असून तालुक्यात प्रथम आले. सरस्वती विद्यालय अंबवणे ९६.२२ निकाल लागला असून प्राचार्य अनिल गरड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे ९७.०५ निकाल लागला. प्राचार्य बाजीराव पवार यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले. न्यू इंग्लिश स्कूल पासली ९४.४४ टक्के निकाल लागला आहे. प्राचार्य क्षमा सूर्यवंशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. न्यू इंग्लिश स्कूल, विंझर ९६.१० टक्के निकाल लागला. प्राचार्य भगवान बेल्हेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
राजगड विद्यालय वाजेघर ९७.२९ टक्के निकाल लागला असून प्राचार्य अजितकुमार कोंढाळकर यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले. वीर बाजी पासलकर विद्यालय पानशेत ९७.०१ निकाल लागला. प्राचार्य संजय अहिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

SCROLL FOR NEXT