पुणे

राजगुरुनगरात एआयचा बिबट्या व्हायरल

CD

राजगुरुनगर, ता. २ : राजगुरुनगरच्या ब्राह्मण आळीमध्ये बिबट्या फिरत असल्याचा, एआयद्वारे तयार केलेला खोटा व्हिडिओ प्रसारित करून खोटी माहिती पसरवत नागरिकांमध्ये भीती निर्माण केल्याबद्दल संबंधितांना वनविभागाने नोटीस बजावली आहे.
राजगुरुनगरातील आपटेवाडा व ब्राह्मणआळी परिसरात बिबट्या फिरत असल्याचा खोटा व्हिडिओ गुरुवारी (ता. १) सोशल माध्यमावर व्हायरल झाला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार येथील रहिवासी अमोल गंगाधर बांबळे यांनी एआयद्वारे बिबट्या फिरत असल्याचा हा व्हिडिओ तयार केला आणि समाजमाध्यमांवर व्हायरल केला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी यश जाधव यांना मिळताच या व्हिडिओच्या खरेपणाबाबत खातरजमा करण्यासाठी वनपाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्या परिसराची पाहणी करण्यासाठी पाठविले.‌ त्यांनी व्हिडिओच्या सत्यतेबाबत संबंधितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बिबट्या फिरत असलेला व्हिडिओ आर्टिफिशियल इंटलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे तयार करून व्हायरल केल्याचे सांगितले.
संबंधितांनी हे कृत्य करून परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण केल्याबद्दल तसेच खोटी माहिती पसरविल्याबद्दल वनविभागाने त्यांना नोटीस बजावली. अफवा पसरविणे, लोकांमध्ये भीती निर्माण करणे, खोटी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आदी कृत्ये ही भारतीय न्यायसंहिता २०२३, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील तरतुदींनुसार प्रतिबंधित आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. म्हणून नागरिकांनी खोटी माहिती अथवा अफवा पसरवून लोकांमध्ये अनावश्यक भीती पसरवू नये, असे आवाहन जुन्नर वनविभागाच्या खेड वनपरिक्षेत्राने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला चिचुका, ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT