पुणे

राजगुरुनगर क्रीडा संकुलाचे रोहित्र चोरीला

CD

राजगुरुनगर, ता. २३ : येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलातील विद्युत रोहित्र चोरट्यांनी शनिवारी (ता. २०) लंपास केले. विशेष म्हणजे, मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी येथे २४ तास पोलिस तैनात असतानाही ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकारामुळे क्रीडा संकुल परिसरात अंधार पसरला आहे.
महावितरणचे सहायक अभियंता प्रमोद जाधव यांनी याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी संकुल आवारातील १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र खाली पाडून त्यातील २०० लिटर ऑईल सांडले आणि ८० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या असल्याने पोलिसांचा खडा पहारा असतो. मात्र, रोहित्र पाडल्यानंतर वीजपुरवठा खंडित होऊनही ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खेड तालुक्यात सध्या सरकारी व खासगी रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त असून, नवीन रोहित्र मिळेपर्यंत त्यांना अंधारात राहावे लागत आहे. पोलिसांनी या चोऱ्यांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

खासगी बसचा भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट दरी कोसळली, ७ प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु...

E-20 Petrol: ई-२० पेट्रोलचा वाहनांवर परिणाम? मायलेज कमी झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ; तज्ज्ञांचे म्हणणे काय?

मला स्पष्ट सांगण्यात आलेलं की... 'दामिनी' मधला अत्याचाराचा सीन करताना अशी झालेली प्राजक्ता दिघे यांची अवस्था

Supriya Sule: शरद पवार गटाचे आठ खासदार घेणार पंतप्रधानांची भेट; 'एफसीआरए' विधेयकासंदर्भात भूमिका केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT