पुणे

प्रा. राजकुमार जगताप यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

CD

न्हावरे, ता. २७ ः न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. राजकुमार जगताप यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भालेराव होते. या कार्यक्रमात प्रा. राजकुमार जगताप व त्यांची पत्नी सुजाता जगताप यांचा विद्यालयाच्या वतीने मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक नितीन केनेकर उपस्थित होते. शिक्षक हे अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना नीती, मूल्ये व संस्कार शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. त्यामुळे सामाजिक जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केनेकर यांनी केले. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्या डॉ. गायत्री खळदकर, माजी सदस्य वसंतराव कोरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, पंचायत समितीचे सदस्य दीपक कोकडे, जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राहुल दिवेकर, भाजपचे प्रदेश सदस्य सुभाष कांडगे, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक महादेव जाधव, सरपंच संदीप यादव, माजी सरपंच गोरख दिवेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शितोळे यांनी केले. प्रा. एन. बी. मुल्ला, डॉ. अविनाश कामठे आणि प्रा. सुनीता जऱ्हाड यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JIO IPO : १० लाख कोटींहून अधिक मूल्यांकनाचा देशातील पहिलाच महा-आयपीओ; ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याकडे रिलायन्सची वाटचाल

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

Uruli Kanchan Crime : विवाहित महिलेला 'तुमचे पार्सल आले आहे' असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांची महागाव बँकेत धडक पीक कर्ज प्रकरणांवरून शाखा व्यवस्थापकाची झाडाझडती

Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येचा दीपोत्सव कसा बनला जागतिक आकर्षण? योगी आदित्यनाथ यांनी सांगितले महत्त्व

SCROLL FOR NEXT