राजपाल यादवला
अखेरची संधी
नवी दिल्ली : पैसे कर्ज म्हणून घेतलेल्या खासगी कंपनीला परतफेड करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अभिनेते राजपाल यादव यांना अखेरची संधी देत दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. यादव यांनी परतफेडीबाबत विश्वासार्ह प्रस्ताव मांडावा आणि न्यायालयात दोन कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. राजपाल यादव परतफेडीसाठी दिलेले धनादेश वटले नसल्याने त्यांच्याविरोधात खटला चालून त्यांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.
स्वतंत्र भारद्वाजला
आंतरिम जामीन
नवी दिल्ली : जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनावेळी एका आंदोलकाच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेला यूट्युबर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली येथील न्यायालयाने तीन आठवड्यांचा आंतरिम जामीन मंजूर केला आहे. या तीन आठवड्यांतील त्याचे वर्तन पाहून त्याच्या जामीनअर्जावर विचार करता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, जामीन म्हणजे न्यायालयाने दाखविलेला विश्वास आहे, तुम्ही विजयी झाल्याचे प्रतीक नाही, असेही न्यायालयाने खडसावून सांगितले.
महिलेकडे मागितली
२०० कोटींची खंडणी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील एका महिलेला कॅनडामधील गँगस्टर गोल्डी ब्रार याच्या नावाने दोनशे कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिल्लीत एवढी मोठी खंडणी मागितल्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.