पुणे

सत्ता नसल्यामुळे भाजप कासावीस; राजू शेट्टींची टीका

शरयू काकडे

पुणे ''भाजपकडे सत्ता नसल्यामुळे कासावीस झाले आहेत, त्यांनी कुणकुणाची जात काढली आहे ते आम्हाला माहिती आहे. राज्यपालांना सध्या वेळ नाहीय, वेळ मिळेल तेव्हा ते सही करतील'' असे वक्तव्य माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.(Raju Shetti Visit Sakhar Ayukta Shekhar gaikwad and Criticise BJP)

''गेल्या वर्षी एफआरपी अदा केली ती तुकड्या तुकड्याने कारखांदारांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना व्याज दिले पाहिजे अन्यथा कारवाई झाली पाहिजे. तातडीने व्याज मिळावे अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी आज भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी,''इथेनॉलमधला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ऊस दर नियंत्रण समिती आहे त्यासंदर्भात विचारविनिमय केला, त्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार करावा. साखर कारखान्यांची शेअरची किंमत आजही एक हजारच आहे. सरकारने आपलं भाग भांडवल वाढत नाही मात्र शेतकऱ्यांना भागभांडवल वाढवायला सांगतेय. ऊस दर नियंत्रण समितीत सदस्य घेतले आहेत ते नामधारी आहेत, त्यांना ऊस शेतीचा अभ्यास नाही. ज्यांना कारखान्याचा संचालक व्हायचे असेल तर त्यांनी 25 लाखाचे शेअर घेतले पाहिजे. याबाबतीत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कोर्टात धाव घेऊ. आधीच्या भाजप आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने ज्या लोकांना समितीत घेतले ते मंत्र्यांच्या जवळचे आहेत.'' अशी माहिती राजू शेट्टी यांनी सांगितली

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी आज भेटीतील महत्त्वाचे मुद्दे

  • येत्या 5 जुलैच्या अधिवेशनात शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणारा ठराव करावा ही मुख्यमंत्रीकडे मागणी केलीय

  • दोन्ही सभागृहात असा ठराव करावा

  • या विधेयकामध्ये आमचे काही आक्षेप आहेत

  • सगळ्यांशी चर्चा करून हे विधेयक मांडावे

  • नवीन विधेयकामध्ये कृषी बाजार समितीबाबत काही तरदूत नाही

  • शेतकऱ्यांची चर्चा करून हे एक आदर्श विधेयक तयार केले पाहिजे

  • शेतकऱ्यांच्या नावावर कुणी कर्ज घेतले असेल मग ते आमदार असो किंवा मंत्री असो त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेच; आमदार संजय शिंदे यांचे नाव न घेता टीका

  • भाजपला सत्ता नसल्यामुळे कासावीस झाले आहेत, त्यांनी कुणकुणाची जात काढली आहे ते आम्हाला माहितीय,

  • दुध दरासंदर्भात हमीभाव देण्याची गरज आहे, दुधाची भेसळ थांबवली आणि कारवाई केली तर दुधाला योग्य भाव मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT