पुणे

राजूर-कोतुळ मार्गाची चाळण

CD

राजूर-कोतूळ राज्यमार्गासाठी ग्रामस्थांचा एल्गार
शेकडो खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त; अपघाताचा धोका वाढला
अकोले, ता. २० : राजूर-धामणगावपाट-कोतूळ राज्यमार्गाची चाळण झाली आहे. ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे?’ असा संतप्त सवाल वाहनचालक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शेकडो खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी चालक त्रस्त असून, अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम आहे.
धामणगावपाट ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले. ठेकेदाराला बिल मिळाले नसल्याने काम रखडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ‘आम्ही मतदान करावे, तुम्ही खोटे बोलावे,’ असे उपरोधिक गीत म्हणत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
किमान खड्डे तरी बुजवा. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती न केल्यास रास्तारोको करू, असा इशारा सुरेश शेळके यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत घाटकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली. कोतूळ फाटा ते कोतूळ मार्गाची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून रस्ता रोको करू, असा इशारा काशिनाथ दिघे, कैलास शेळके, राजेंद्र देशमुख, जयंत घाटकर, रवींद्र घाटकर, रमेश देशमुख, संजय फटांगरे, बाबुराव खरात, मोहन तळेकर, संजय सावंत, सीताराम देशमुख, धनंजय देशमुख, सुनील गिते, सुनील आरोटे, विनय समुद्र आणि प्रदीप भाटे आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT