mahatma.jpg 
पुणे

फुले दांपत्य सन्मानदिनी येत्या बुधवारी भव्य रॅली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव
समितीतर्फे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दांपत्याच्या
सन्मानार्थ येत्या बुधवारी (ता.1 जानेवारी) भिडे वाडा ते समताभूमी महारॅली काढण्यात येणार आहे.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी 1 जानेवारी 1948 ला येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतिपथावर नेत आहे.

त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले
दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, रॅलीचे मुख्य संयोजक डि. के. माळी आणि महात्मा फुले
वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी आमदार कमल ढोले-पाटील, अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त राजाराम रायकर, काळूराम अण्णा गायकवाड, मधुकर राऊत, सुधीर पैठणकर, सुनीता भगत, हनुमंत माळी, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष बी.के. माळी आदी उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता रॅलीचे उद्‌घाटन केले जाणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत. सजविलेले दोन रथ, लेझीम आणि ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक या रॅलीत
सहभागी होणार आहेत. भिडे वाड्यापासून निघालेली ही रॅली दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघंटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याने फुले वाड्यावर जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT