पुणे

राममंदिर देणगी गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा :न्यायालय

CD

राममंदिर देणगी गैरव्यवहाराची
चौकशी लवकर पूर्ण करा :न्यायालय
नवी दिल्ली, ता. १७ (पीटीआय): अयोध्येतील राममंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला तपास जलदगतीने पूर्ण करून तो तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि न्यायाधीश व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने एसआयटीला तपासातील प्रगतीचा स्थिती अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यास सांगितले.तसेच, या प्रकरणातील विविध पक्षकारांनी तपास अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. एसआयटीचा अहवाल तपासल्यानंतर भाविकांकडून राम मंदिरात दिल्या जाणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्याचा विचार न्यायालय करणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. यापूर्वी २७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने कथित देणगी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आयजीपी किरण एस. यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय एसआयटी स्थापन केल्याची दखल घेतली होती. तसेच चौकशी पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करण्याचे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. देणगी व्यवस्थापनात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात आरजेडीचे खासदार सुधाकर सिंह यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

खराब अन्न मिळालं? आता QR कोड स्कॅन करा, फोटो-व्हिडिओसह तक्रार करा, FDA चा मोठा निर्णय, नेमकी सुविधा काय?

'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Marathi News Live Updates : गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणारा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा पोलिसांनी पकडला

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

SCROLL FOR NEXT