राम सातपुते यांचा फोटो वापरावा.
---
भाजप प्रदेश चिटणीसपदी
राम सातपुते यांची निवड
पक्षाकडून राज्य पातळीवर जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. २७ : माजी आमदार राम सातपुते यांची भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाली आहे. राज्य पातळीवरील संघटनेतील महत्त्वाचे पद मिळाल्याने माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मोहिते- पाटील यांचा भाजपपासून दुरावलेला प्रवास आणि तालुक्यात निर्माण झालेली नवी राजकीय समीकरणे यामध्ये राम सातपुते यांनी एकहाती लढा दिला. मोहिते- पाटील व आमदार उत्तमराव जानकर या दोन प्रभावी गटांच्या विरोधात त्यांनी पक्ष संघटना मजबूत ठेवत कार्यकर्त्यांना उभारी दिली. विधानसभेतील निसटत्या पराभवानंतरही त्यांनी अकलूज नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करून सुमारे दहा हजार मते मिळवली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला जिल्हा परिषदेच्या दोन जागा व माळशिरस पंचायत समितीच्या सहा जागांवर यश मिळाले. प्रत्येक ठिकाणी मोहिते पाटील - जानकर आघाडीला त्यांनी जोरदार लढत दिली. दहिगाव गटात त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी जानकर यांच्या कुटुंबीयांचा पराभव केला, तर गुरसाळे गणात मोहिते- पाटील यांच्या नातलगांनाही पराभव पत्करावा लागला.
या सातत्यपूर्ण राजकीय संघर्षाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे. सध्या ते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
---
चौकट
विधान परिषदेकडे लक्ष
राम सातपुते यांची विधान परिषदेत निवड व्हावी, अशी इच्छा तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होत आहे. सध्या रणजितसिंह मोहिते- पाटील सदस्य असून, त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.