पुणे

भोर शहराचा कायापालट करणार

CD

भोर, ता. २ : येथील नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रामचंद्र श्रीपती आवारे यांनी गुरुवारी (ता. १) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी २० सदस्यांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार सदस्य वगळता भाजपच्या १६ सदस्य अनुपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर आमदार शंकर मांडेकर यांनी आवारे यांचा सत्कार केला. आपणाला निवडणुकीत विजयी केल्याबद्दल भोरवासीयांचे आभार माणून शहरातील पाणी, स्वच्छता व आरोग्य याकडे विशेष लक्ष देवून शहराचा कायापालट करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता रामचंद्र आवारे यांच्या पदभार कार्यक्रमास मुख्याधिकारी गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, गणेश निगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदिप शेटे, विशाल कोंडे, माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे, कविता खोपडे, नवनिर्वाचित नगरसेवक केदार देशपांडे, सुरेखा मळेकर, कुणाल धुमाळ, अनिल भेलके, उस्मानभाई शेख, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, राजन घोडेस्वार, अनुप धोत्रे, ऋषभ आवारे आदी उपस्थित होते.
रामचंद्र आवारे यांच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण साथ दिली जाणार असून, त्यांना निधीची कमी भासू देणार नसल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकास करण्यासाठी भोरवासीयांनी मला पाच वर्ष सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आवारे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT