Ramdas Athawale
Ramdas Athawale sakal
पुणे

काँग्रसने हिंमत दाखवून महाविकास आघाडीतून बाहेर पडावे

डॉ. संदेश शहा

इंदापूर - राष्ट्रवादी काँग्रेसने खरोखर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर काँग्रेसने हिंमत दाखवून महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. इंदापूर तालुका आर.पी.आय. आठवले गटाच्यावतीने इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री.आठवले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी तून काँग्रेस बाहेर पडल्यास आम्ही सरकार बनवू शकतो. आगामी महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आमचा पक्ष भाजपसोबत राहणार असून आम्ही सन्मान जनक जागा घेऊन त्या निवडून आणणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना राज्यसभेच्याजागे वर शब्द देवून शिवसेनेने तो न पाळून त्यांच्यावर अन्याय केला आहे. जोपर्यंत आरपीआय भाजपा सोबत आहे,तोपर्यंत मनसेची भाजपसोबत युती होऊच शकत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले .देशात समान नागरी कायदा लागू झाल्यास मागासवर्गीय व मुस्लिम बांधवांना त्याचाकोणताही धोका नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी आरपीआय पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,संदेश सोनवणे, अमोल मिसाळ, नितीन आरडे, राजू घाडगे,नितीन झेंडे ,सुनील सर्वगोड, राकेश कांबळे, नितीन झेंडे, सुनील सोनवणे उपस्थित होते. आरपीआय तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांनी सूत्रसंचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT