ramdas athwale 
पुणे

कर्जमाफीसाठीचा पैसा आणणार कोठून?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे फक्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. पण, त्यासाठी लागणारा निधी कोठून आणणार, असा प्रश्‍न करीत ही घोषणा अन्यायकारक असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पुणे दौऱ्यावर आले असता रविवारी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी या वेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि शिवसेनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मतभेद आहेत. असे अनेक मुद्दे भविष्यात समोर येत राहतील. त्यामुळे समान विचारसरणी असलेल्या शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्ट केले आहे. तरीही, काँग्रेस व विरोधी पक्ष चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवत आहेत. मुस्लिमांना भडकविण्याचे काम सुरू आहे. अयोध्येच्या निर्णयावर दोन्ही धर्मांकडून शांतता राखण्यात आली होती. त्याप्रमाणे आत्ताही शांतता पाळली पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs WI, T20I: श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! रोहित-सूर्यालाही जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलंय

आजचे राशिभविष्य - 07 सप्टेंबर 2026

Egg Recipe: अंडे, चीज अन् क्रीमी सॉसची भन्नाट मेजवानी; १० मिनिटांत बनवा व्हायरल 'कोरियन एग ड्रॉप सँडविच'!

National Pickleball Championship 2026: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कोचीमध्ये वर्चस्व! सर्व श्रेणींमध्ये मिळवले संघ अजिंक्यपद!

SCROLL FOR NEXT