पुणे

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दौरा

CD

PNE26W29824
अहिल्यानगर ः केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड समवेत जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, विलास साठे आदी.
-----------------
जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या
बैठकीत नियोजनाचा आढावा
अहिल्यानगर, ता. २५ ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ७ जुलै रोजी शेवगाव तालुका दौऱ्यावर येत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांसह सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. शेवगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दक्षिण जिल्हा संकल्प मेळाव्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी, तसेच जनसंपर्क अभियानावर चर्चा झाली. या बैठकीत विविध तालुके, शहर व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावांत बैठका घेणे, युवक व महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, विलास साठे, गणेश कदम, अंबादास अरोळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, अमित काळे, युवक शहराध्यक्ष राहुल कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, महिला तालुकाध्यक्षा कविता नेटके, महिला शहर जिल्हाध्यक्ष माया जाधव, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT