पुणे

#GyanGanesh जिद्द, कष्टाने उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य 

यशपाल सोनकांबळे

पुणे - घरात अठराविश्‍व दारिद्य्र, आई-वडील मोलमजुरी करणारे...अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या कष्टांतून त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. वेटर, वायरमन ते उद्योजक अशी ओळख असलेल्या रामदास माने यांनी "माने ग्रुप ऑफ कंपनीज'च्या माध्यमातून जगभरात आपली ओळख निर्माण केली व थर्माकोलच्या उद्योगात नाव कमावले. 

"ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर स्वस्त स्वच्छतागृह तयार करणाऱ्या व थर्माकोलच्या व्यवसायात अग्रगण्य असलेल्या माने यांच्या देशासह परदेशात सहा कंपन्या आहेत. मुख्यतः "माने ग्रुप ऑफ कंपनीज'चे काम भोसरी व इंदापूरमधील शाखांमधून चालते. या माध्यमातून माने यांनी संयुक्त अरब अमिरातीतील मस्कत येथील राजासमध्ये जगातील सर्वांत मोठा थर्माकोल निर्मितीचा प्रकल्प उभा करून दिला व त्याची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही घेतली. 

माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोधवडे गावचे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून माने यांना दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. त्यांची आई त्यांना शाळेत सोडण्यासाठी दररोज 28 किलोमीटर पायी प्रवास करीत असे. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर माने यांनी आजीकडून 20 रुपये उसने घेत सातारा येथील आयटीआयमध्ये वायरमनच्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. दिवसा शिक्षण, रात्री एसटी स्टॅंडवर मुक्काम करत एका हॉटेलमध्ये त्यांनी साडेतीन रुपयांच्या पगारावर वेटरचे काम केले. वायरमनच्या अभ्यासक्रमात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर भोसरीतील महिंद्रा सिंटर्ड, पिंपरीतील फिनोलेक्‍स कंपनीत मेंटेनन्स व्यवस्थापक म्हणून काम बघितले. के. के. नाग कंपनीतील व्यवस्थापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर साठविलेल्या पाच लाखांमध्ये त्यांनी एमआयडीसीत जागा घेतली व "माने इलेक्‍ट्रीकल्स' ही पहिली कंपनी सुरू केली. माने यांना देश व राज्य पातळीवरील 125 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. दरम्यान, ग्रामस्वच्छता अभियानात लोधवडे गावाला 2007 मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी 25 पैकी दोन स्वच्छतागृहे आवश्‍यक होती. तीन दिवसांमध्ये थर्माकोलवर सिमेंट कॉंक्रिट करून दोन स्वच्छतागृहे बनविण्याचे तंत्र माने यांनी विकसित केले. 

- 23 हजार स्वच्छतागृहांची निर्मिती 
- 45 देशांमध्ये 128 थर्माकोल निर्मिती प्रकल्पांची उभारणी 
- 352 प्रकल्पांसाठी मशिनरी निर्यात 


यातून आपण काय घेणार? 
- कोणत्याही कामाला कमी लेखू नका, त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो. 
- आपल्या कामात नावीन्य शोधा व काळानुसार स्वतःला बदलत राहा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT