पुणे

Øझोळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

CD

झोळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भोंदू मनोहर मामाचा काळा पैसा पांढरा करून दिल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ ः भोंदू मनोहर मामा भोसले याच्याकडील काळा पैसा पांढरा करून परत त्याला दिल्याच्या आरोपाखाली रामदास झोळ यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांच्या शिक्षण संस्थेतील काहींवर गुन्हा दाखल झाला आहे. यात अटकेच्या भीतीने झोळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी दोन अर्ज केले होते. ते न्यायालयाने फेटाळले आहेत.

मनोहर भोसले याच्याविरुद्ध करमाळ्यात चार, कुर्डुवाडीत एक आणि बारामती व दौंड पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. यामध्ये आतापर्यंत २४ जणांवर गुन्हे दाखल असून, करमाळ्यातील रामदास झोळ, त्यांची पत्नी माया झोळ, लक्ष्मीकांत लिगाडे, राजेंद्र हुंबे यांचाही समावेश आहे. रामदास झोळ यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी व करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल असून, कुर्डुवाडी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. मात्र, ते फरार झाले आहेत. अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दोन अर्ज दाखल केले.

दरम्यान, झोळ यांच्या एकूण ११ शैक्षणिक संस्था आहेत. त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मुख्य संशयित मनोहर भोसलेसोबत हातमिळवणी, संगनमत करून त्याच्याकडून काळा पैसा रोख स्वरूपात संस्थेच्या नावावर स्वीकारला. तो पैसा संस्थेच्या कर्मचाऱ्यामार्फत पांढरा करून पुन्हा मनोहर भोसलेच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर ऑनलाइन जमा केला. संशयितांनी मनोहरकडून काळा पैसा पांढरा करून घेतल्याने त्याच्यावरील दाखल गुन्ह्यात सामील होऊन त्यास मदत केली.

यामुळे झोळ यांना पोलिस कोठडीत घेऊन एकूण किती पैसा आणि कोठून, कोणाकडून आणला, कोणाकोणाच्या नावे आणला व कोणाला दिला, तसेच मनोहर भोसलेने केलेल्या गुन्ह्याशी यांचा काही संबंध आहे का, या बाबींचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना जामीन दिल्यास संस्थेचे डिजिटल कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड नष्ट होऊ शकते, असा युक्तिवाद ॲड. राजपूत यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे आणि आर. एस. रोटे यांनी रामदास झोळ यांचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT