Social_Distancing_at_Pal 
पुणे

पालावरच्या जगात कसला कोरोना अन् कसलं अंतर, उघड्या आकाशाखाली जगणं निरंतर!

रमेश मोरे

जुनी सांगवी : कोरोना महामारीच्या संकटकाळात कष्टकऱ्यांची परवड झाली आहे. तशीच रस्त्याच्याकडेला पालावर राहणाऱ्यांचीही. मात्र, या पालांवर कुठला आलाय कोरोना आणि कसलं सामाजिक अंतर. उघड्या आभाळाखाली जगणं हेच निरंतर फिरणारं चक्र. कोरोना महामारी असो वा अन्य काही जगण्याच्या धडपडी पलीकडे इथं सारच गौण.

माणूस सुखासाठी आयुष्यात फक्त धावाधाव करतो. सुख या शब्दाची कल्पना प्रत्येकाने आपआपल्या सोयीनुसार केली आहे. मात्र, जगण्याच्या धडपडीत आधाराविना भटकंती करणाऱ्या आणि रस्त्याच्याकडेला पालाखालचं आयुष्य जगणाऱ्या लोकांमधे ना कोरोनाची भीती ना सामाजिक अंतर, कुणीतरी येईल देईल या आशेवरच इथलं जगणं.

जुनी सांगवी आणि नवी सांगवीला जोडणाऱ्या माहेश्वरी चौकाशेजारील पी.डब्ल्यु.डी.मैदानालगत जवळपास अशी वीस कुटुंब गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास आहेत. रस्त्यावरचं जगणं, मिळेल तो कामधंदा करून गुजराण करणारं, मात्र कोरोना महामारीच्या संकटात यांच्या हातालाही काम नाही. त्यामुळे आजवर मदतीवरच यांनी लॉकडाऊनचे दिवस काढले. आता मदतीचे हातही मंदावले आहेत. वरून प्रशासनाकडून येथून हाकलण्याची भीती. सगळं काही उजाड उघड्यावरच जिणं.
एरवी इतरांची मुलं लॉकडाऊन असल्याने टी.व्ही., मोबाईल आणि इतर छंद, खेळात व्यस्त असलेली पाहायला मिळतात. मात्र, रस्त्याकडेला ज्येष्ठ नागरीकांसाठी पालिकेने बांधलेल्या विसावा कट्ट्यात इथली मुलं बागडताना दिसतात.

कोरोना असो की अन्य काही. उद्यान असो वा उजाड रान मात्र बालपणातील निर्मळ आनंद घेता आला पाहिजे, असेच या बालचमूंकडे पाहिल्यास मनात आल्याशिवाय राहत नाही. आई-वडील कामगार अड्ड्यावर मोलमजुरीच्या शोधात गेल्यावर या मुलांसाठी ज्येष्ठ नागरीकांचा कट्टा म्हणजे दिवसभर खेळण्याबागडण्यासाठी हक्काचं ठिकाण. इथ ना कोरोना ना कसंल सामाजिक अंतर...उघड्या आकाशाखाली जगणं हेच निरंतर...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT