Ramesh Wanjle, Datta Fuge and now Samrat Moze Pune lost three Golden Man 
पुणे

रमेश वांजळे, दत्ता फुगे आणि आता सम्राट मोझे; पुण्याचे तीन गोल्डन मॅन हरपले

उमेश घोंगडे

पुणे : पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनींना भाव आल्यानंतर पुण्यात सोन्याची मागणी अचानक वाढली. त्या सोन्याचे प्रदर्शन करण्याचीही प्रथा त्यात सुरू झाली. मग सोने अंगावर चढवणाऱ्या गोल्डन मॅनला प्रसिद्धी मिळू लागली आणि अनेकजण त्याचे अनुकरण करु लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यातील पहिले गोल्डन मॅन म्हणजे दिवंगत आमदार रमेश वांजळे. वांजळे हे पहिलवान होते. राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली सोन्याची हौस पूर्ण करायला सुरवात केली. वांजळे मूळचे कॉग्रेसचे कार्यकर्ते. पिंपरीत महापालिकेच्या स्मशानभूमीत चौकीदाराचे काम करणारा हा माणूस केवळ स्वकर्तृत्वावर विधानसभेचा आमदार झाला. रसाळ वाणी आणि समोरच्यावर छाप पाडणाऱ्या व्यक्तीमत्वातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून वांजळे २००९ साली विधानसभेत पोचले. त्या काळातील त्यांची लोकप्रियता भल्याभल्या राजकारण्यांना हेवा वाटावा, अशी होती. सोने अंगावर घालून ते भाषणात संतवचने पेरीत. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांचा आकार आणि वजन दिवसेंदिवस वाढत गेले. त्यातून त्यांची चर्चा होऊ लागली. धिप्पाड देह, पहिलवानी शरीर, दाढी आणि त्यावर सोन्याचे  वजनदार दागिने यामुळे वांजळे यांचा रुबाब लगेच सामान्यांच्या लक्षात येऊ लागला. त्यांची क्रेझच निर्माण झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्ऱचना झाली. अशात वांजळे यांनी तिकीटासाठी राष्ट्रवादीकडे प्रयत्न केले. मात्र तेथून तिकिट मिळणार नसल्याचे समजल्यानंतर वांजळे हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सोन्याने मढवलेल्या अंगासह गेले. ते सोने पाहून राज ठाकरेपण आश्चर्यचकीत झाले. राज यांनी वांजळे यांना सोने कमी घालण्याचा सल्ला दिला. रोजच सोने घालावे लागते, असे राज यांना पटवून दिले. त्यामुळे त्या विषयावर राज यांनी त्यांना परत सल्ला दिला नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वांजऴे हे मनसेच्या चिन्हावर आमदार झाले. त्यामुळे विधानसभेतही वांजळे हे सोनेरी आमदार म्हणून प्रसिद्ध झाले. राज्यभर ते त्यांच्या सोन्यामुळे प्रसिद्ध झाले. मात्र याच वांजळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नियमित तपासण्यांसाठी म्हणून ते रुग्णालयात गेले. तेथेच वयाच्या 46 व्या वर्षी त्यांचा 10 जून 2011 रोजी अकाली मृत्यू झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वांजळे यांचा मृत्यू झाल्यानंतर गोल्डन मॅन असा कोणी नव्हता. मात्र 2012 मध्ये राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवला. त्यावर सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याच्या चेन, कडे असा पोषाख केला. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची ख्याती झाली. त्याची गिनेज बुकमध्ये नोंदही झाली. मात्र या फुगे यांचा दुर्देवी अंत झाला. आर्थिक देवाणघेवाणीवरून फुगे यांचे काही जणांशी वितृष्ट आले होते. त्यातून फुगे यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलविणे पाठविले आणि त्यांचा दगडाचे ठेचून खून केला. त्यांनी त्यांच्या अंगावर अडीच कोटी रुपयांचे सोने घातले होते. त्यातील शर्ट हा दोन कोटी रुपयांचा होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यातील तिसरा प्रसिद्ध गोल्डनमॅन व उद्योजक म्हणजे सम्राट हिरामण मोझे. त्यांचे वयाच्या 34 व्या वर्षी हृदयविकाराने पाचे मे रोजी निधन झाले. रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सम्राट यांची अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची स्टाईल वेगळी होती. सुमारे ८ ते १०  किलो सोने ते अंगावर घालत. त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन, असे नाव पडले होते. सम्राट यांची दखल दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ही घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT