पुणे

देशाचा आत्मा वाचविण्यासाठी आंदोलन <Br>

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२९ ः ‘‘रामलीला मैदानावर रविवारी (ता.१) होणारी  महारॅली ही देशाचा आत्मा आणि राज्यघटना वाचविण्यासाठीचे महाआंदोलन असल्याचे सांगून पोलिसांच्या लाठीमाराची  काळजी न करता व अजिबात न घाबरता मोदी सरकारमुळे त्रस्त झालेल्या  जनतेने  सहभागी व्हावे, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केले. 
इंडिया’ आघाडीने आयोजित केलेल्या या आंदोलनासाठी रविवारी सकाळी दहापासून सायंकाळी पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी - वद्रा यांनी  रामलीला मैदानावर जाऊन रॅलीच्या तयारीची पाहणी केली.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीचे नेते एक नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढून रामलीला मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील.  या महारॅलीला कॉक्रोच जनता पक्षानेही (सीजेपी)  पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी पक्ष एकजूट असून ज्ञानेशकुमार मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा  राजीनामा देत नाही किंवा पंतप्रधान मोदी त्यांना पदावरून हटवित नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.’’
 ‘चलो रामलीला मार्च’ म्हणजे लोकशाही वाचविण्यासाठी, मतांची चोरी रोखण्यासाठी आणि राज्यघटना वाचविण्यासाठीची महारॅली आहे. ही कुठल्या राजकीय पक्षाची रॅली नाही.  नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेशकुमार यांच्यापासून त्रस्त असलेल्या, लोकशाही वाचविण्याची इच्छा असलेल्या आणि राज्यघटनेचे रक्षण करू इच्छिणाऱ्या लोकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.  या रॅलीत भाग घेणाऱ्या लोकांनी  पोलिस किंवा लाठीमाराची कोणतीही काळजी करू नये. भाजपमध्ये दंगल किंवा मनमानी करण्याची धमक नाही.  राज्यघटनेच्या,  देशाच्या रक्षणासाठी आपण एकत्र चालणार आहोत.  घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे गांधी म्हणाले. 

‘विचारसरणी विसरून सहभागी व्हा’
‘‘जर भारतावर हल्ला होत आहे, जर आपण धोक्यात आहो, आपली अभिव्यक्ती, आपले विचार आणि विचार करण्याची पद्धत धोक्यात आली आहे, असे वाटत असेल तर सर्व विद्यार्थी संघटनांना त्यांच्या राजकीय विचारसरणीचा विचार न करता  या महारॅलीमध्ये सामील व्हावे,’’ असे आवाहन  राहुल गांधी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

SCROLL FOR NEXT