पुणे

शिवमहापुराण कथा सोहळ्यात नामाचा गजर

CD

शिरूर, ता. २८ : ‘‘प्रभू श्री रामचंद्राने स्वहस्ते शिवपिंडीची प्रतिष्ठापना करून भगवान शिवशंकराची आराधना केल्याचे रामलिंग हे ठिकाण असल्याने प्रभू रामाच्या पदस्पर्शाने आणि भगवान शंकराच्या अस्तित्वाने शिरूरची भूमी पावन झाली आहे. दोन महान दैवतांच्या अस्तित्वाचे हे तीर्थक्षेत्रच आहे,’’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केले.
श्री रामलिंग देवस्थानच्यावतीने घेण्यात येत असलेल्या श्री शिवमहापुराण कथासोहळ्यात पंडित मिश्रा यांनी संतांच्या योगदानाचे सामाजिक जीवनातील महत्त्व विषद केले. ते म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराज, जनाबाई, मुक्ताबाई या संतांनी समाजाला परोपकारभाव शिकवताना संस्कार दिले. त्या संस्कारावरच सामाजिक घडी बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांसारख्या महापुरूषांच्या, अनेक उपासक आणि साधकांच्या योगदानाने ही सामाजिक घडी मजबूत झाली आहे. कितीही संकटे आली, कितीही आक्रमणे झाली तरी समाजाची ही एकजूट तुटू शकत नाही.’’
कथेदरम्यान, पंडित मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी भक्तिगीते, भावगीते आणि भजने म्हटली. शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’ बरोबरच ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘श्री स्वामी समर्थां’च्या नामाचा जयघोष केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. अहिल्यानगरच्या माजी महापौर सुरेखा कदम, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्‍वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुसुम मांढरे, मनीषा कटके, सुनीता मनसुके आदी यावेळी उपस्थित होते. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विजय दुगड यांनी प्रास्ताविकात सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मिठू गदादे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनी यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

How Much Prize Money Will Pakistan Get? पाकिस्तानी २७-२८ कोटी जिंकण्याच्या इराद्याने आले होते, बघा किती बक्षीस रक्कमेवर समाधान मानावे लागले...

इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

Sakal Property Mahayatra : नाशिकमध्ये घराचं स्वप्न आता होणार पूर्ण! मालेगावात 'सकाळ प्रॉपर्टी महायात्रा' प्रदर्शनाचा दिमाखदार प्रारंभ

karad Crime: कऱ्हाडमध्ये आणखी एक बांगलादेशी महिला ताब्यात; पाेलिसांचा मलकापुरात छापा, दुसऱ्या नावाचे आधारकार्ड!

SCROLL FOR NEXT