Ajit-pawa
Ajit-pawa 
पुणे

तुम्ही शेतकऱ्यांचे लुटारू आहात; अजित पवारांवर बारामतीत टीका

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर ः "दौंड शुगरने सभासदांना 2800 रुपये भाव दिला, तर माळेगाव कारखान्याने "गेटकेन'ला राज्यातील सर्वाधिक 2850 भाव दिला. तुम्ही शेतकऱ्यांचे लुटारू आहात,'' अशा शब्दांत माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

मुरूम (ता. बारामती) येथे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि सोमेश्वर कारखान्याचे संचालक पी. के. जगताप यांच्या पुढाकाराने "माळेगाव'च्या संचालकांचा उसाला राज्यात सर्वोच्च भाव दिल्याबद्दल आज सत्कार करण्यात आला. त्या वेळी तावरे बोलत होते.

ते म्हणाले, ""ऑनलाइन निविदापद्धतीने पाच ते पस्तीस टक्‍क्‍यांनी किमती घटल्याने वर्षात आमचे दहा कोटी वाचले. स्टोअरची खरेदी नऊ कोटींहून सहा कोटींवर आणली. राष्ट्रवादीच्या एका कारखान्याची गोदामाची निविदा 9 टक्के वाढीव जाताना आमच्या गोदामाची निविदा त्याच दिवशी 19 टक्के कमी दराने गेली. अशा काटकसरीच्या कारभारामुळे ओढाताण न करता "माळेगाव'ने सभासदांना सर्वोच्च भाव दिला. मात्र, अजितरावांना याचं दुःख वाटतंय.''

या प्रसंगी "सोमेश्वर'चे ज्येष्ठ संचालक नामदेव शिंगटे, माजी संचालक फत्तेसिंह जगताप, "माळेगाव'चे उपाध्यक्ष चिंतामणी नवले, प्रमोद गावडे, अशोक सस्ते, अप्पाजी गायकवाड, अविनाश जगताप, शहाजी जगताप, नंदकुमार शिंदे, धन्यकुमार जगताप, दिग्विजय जगताप, अशोक मुळीक उपस्थित होते. आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराबद्दल प्रमोद काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.

"सोमेश्वर'चे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांचेही या वेळी भाषण झाले. पी. के. जगताप यांनी प्रास्ताविक, रविराज जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सुदाम गायकवाड यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT