Ranjit Nimbalkar Firing Case  esakal
पुणे

Gautam Kakade : 'सुंदर' नावाच्या प्रसिद्ध बैलावरून वाद; रणजित निंबाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या गौतम काकडेला अटक

गौतम काकडे यांचे बंधू गौरव यांनी पिस्तूलातून थेट रणजीत यांच्या डोक्यात गोळी झाडली होती.

संतोष शेंडकर

पोलिसांनी घटनेदिवशीच गोळीबार करणारा आरोपी गौरव आणि ज्यांच्या नावे पिस्तुल आहे ते सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे याना अटक केली.

सोमेश्वरनगर : निंबुत (ता. बारामती) येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे (Gautam Kakade) यास 'एलसीबी'च्या पथकाने (LCB Squad) भोर परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. या अटकेसाठी रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar Firing Case) यांचे चाहते व नातेवाईक आक्रमक झाले होते. यामुळे या अटकेने अखेर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आसामी गौतम काकडे यांनी फलटण येथील बैलगाडा (Bullock Cart Race) क्षेत्रातील बडे नाव असलेल्या रणजीत निंबाळकर यांचा 'सुंदर' नावाचा प्रसिद्ध बैल सोमवारी (ता. 24) पाच लाख रुपये इसार देऊन खरेदी केला होता. गुरुवारी रात्री उर्वरित 32 लाख रक्कम नेण्यासाठी बोलावले होते. निंबाळकर हे पत्नी, मुलगी, दोन मित्रांसह पैसे गौतम काकडे यांच्या घरी गेले. घरासमोर चर्चेतून वादावादी झाली.

याप्रसंगी गौतम काकडे यांचे बंधू गौरव यांनी पिस्तूलातून थेट रणजीत यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे रणजीत यांचा मृत्यू झाला. यामुळे आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूची बातमी समजताच बैलगाडा क्षेत्रातील निंबाळकर यांचे असंख्य चाहते, त्यांच्या अकादमीचे विद्यार्थी, नातेवाईक संतप्त झाले होते.

पोलिसांनी घटनेदिवशीच गोळीबार करणारा आरोपी गौरव आणि ज्यांच्या नावे पिस्तुल आहे ते सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे याना अटक केली. दोघांना पोलिस कोठडीही मिळाली आहे. मात्र गौतम काकडे फरार झाला होता. 'फरार आरोपीस अटक करून कडक शासन करा' या मागणीसाठी हजारापेक्षा अधिक लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली होती. तसेच रणजित यांची पत्नी अंकिता यांनीही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काकडे यांच्या निवासस्थानी जाण्याचा काही आंदोलकांनी इशारा दिला होता. यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला होता. आठ पथके गौतमच्या मागावर होती. अखेर पोलिसाना यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भोर येथून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे, पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT