पुणे

धक्कादायक! फोटोंची धमकी देत पुण्यात तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : मैत्रिणीला फोटोंची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नारायणगाव येथे घडला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपी अनिकेत संजय जाधव (वय 21, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, मूळ रा. जामखेड, जि. नगर) यास अटक केली. 

पीडित तरुणी कुरण (ता. जुन्नर) येथील आभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच, आरोपी तरुणही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याने मैत्रीचा फायदा घेऊन तिच्यासोबत काढलेले फोटो नातेवाइकांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

या तक्रारीवरून आरोपीला बुधवारी (ता. 18) सायंकाळी अटक केली. जुन्नर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Uday Samant : शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा : उदय सामंत

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Donal Trump: 'मी त्यांच्या पार्श्वभागाकडे पाहिले, पण...'! ट्रम्प यांचा 'तो' व्हिडिओ का होतोय व्हायरल?

Latest Marathi News Live Update : शेतातून सोयाबीनची २० पाेती लंपास, ४८ हजारांचा माल चोरीला

SCROLL FOR NEXT