cri.jpg
cri.jpg 
पुणे

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील एका गावातील मुलीवर, सहा महिन्यांपूर्वी तरूणाने बलात्कार केला होता, यामध्ये पिडीत मुलगी गरोदर राहिली आहे. पीडित मुलगी तेव्हा अल्पवयीन होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडितेच्या आईने याप्रकरणी खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, खेड पोलिसांनी महेश दौंडकर ऊर्फ पिंट्या ( रा. कनेरसर, ता. खेड) याच्यावर बलात्काराचा आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी विशेष मुलगी आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वीच्या कालखंडात, पीडितीचे आई-वडील शेतात कामाला गेल्यावर आणि धाकट्या दोन बहिणी शाळेत गेल्यावर, संशयित आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. कोणास सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी संशयिताने तिला दिली होती.

पीडितेला पित्ताचा त्रास होऊ लागल्यावर आई-वडिलांनी ४ ऑगस्ट रोजी डॉक्टरांकडे नेऊन उपचार केले. काही दिवसांनी तिला बरे वाटू लागल्यावर, आईने विचारले तेव्हा तिने हकिकत सांगितली. त्यानंतर आईवडिलांनी तिला एका महिलाश्रमात ठेवले. तिथे तिचे समुपदेशन करून, पुन्हा तिला विचारल्यावर तिने तशीच हकीकत सांगितली. त्यानंतर योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी ११ ऑगस्ट रोजी रात्री फिर्याद दाखल केली.

या प्रकरणातील खऱ्या संशयित आरोपीला वाचविण्यासाठी त्याचे वडिल मुलीच्या घरच्यांवर दबाव आणत आहेत. स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी अन्य व्यक्तीचे नाव पुढे करीत आहेत. तीच व्यक्ती पीडितेच्या आई-वडिलांना घेऊन खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती, परंतु पोलीसांनी दोन तास बसवून तक्रार घेतली नाही, असे निवेदन एका सामाजिक कार्यकर्त्याने पुणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांना दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलीसांनी सर्वांगीण चौकशी करून, पिडिता, संशयित आरोपी, आश्रमात नाव दिलेली व्यक्ती या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून, खरा दोषी आरोपी व त्याला साथ देणारे या सर्वांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT