crime_wome
crime_wome 
पुणे

पुणे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील पाबळ येथील एका अल्पवयीन मुलीवर अश्लिल मोबाईल व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोघांवर बाललैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्याने हे कृत्य केले, तो मुलगा अल्पवयीन असून, त्याची शिरूर न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर दुसऱ्या आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.   

याबाबत पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास त्या शेतमजुरी करून आपल्या घरी आल्या होत्या. त्यावेळी त्या आपल्या अल्पवयीन मुलीवर रागवल्या होत्या. त्यामुळे मुलगी शेजाऱ्यांच्या घरी गेली होती. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास ती आपल्या घरी परत येत असताना गावातीलच अल्पवयीन आरोपीने मंगेश राजू चव्हाण (वय १९, रा. पाबळ) या त्याच्या मित्राला जवळच्या एका मंदिराच्या बाजूला कुणी येतंय का, असं म्हणून लक्ष ठेवायला लावले. या काळात आरोपीने या अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लिल चित्रफिती दाखवून तिच्यावर अत्याचार करून बलात्कार केला. 

दरम्यान, मुलगी उशीर होऊनही घरी न परतल्यामुळे पीडित मुलीच्या आईने जवळच राहणाऱ्या सागर नामक मुलाला मुलगी सापडत नाही शोध, असे सांगितले. तेव्हा सागर याने सदर गैरप्रकाराची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच मुलगी घरी येऊन रडू लागली. तिने आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

दरम्यान, सदर प्रकार पोलिसांना कळविला असता आईच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुख्य आरोपी व मंगेश राजू चव्हाण या दोघांवर बाललैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन आरोपीला न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून, मंगेश चव्हाण याला ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळूंखे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT