Rape 
पुणे

बचत गटाच्या मिटींगसाठी कुरकुंभ येथे नेऊन विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक

सावता नवले

कुरकुंभ - बचत गटाची मिटींग असल्याचं सांगत महिलेवर जबरदस्तीनं बलात्कार केल्याची घटना कुरकुंभ (ता. दौंड) येथे घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आठवड्याभरापूर्वी ही घटना घडल्याचं पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका विवाहित महिलेला रझिया सय्यद (वय ४०, रा. खोर, ता. दौंड) या महिलेनं बचत गटाच्या मिटींगसाठी जायचं आहे असं सांगून एका चारचाकी वाहनातून कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका लॉजवर नेलं. यावेळी त्यांच्याबरोबर विशाल रोहिदास चौधरी (वय ३२, रा. मटकळा पवार वस्ती, खुटबाव, दौंड) आणि देविदास केरबा पवार (वय ४०, रा. नाथाचीवाडी, ता. दौंड) होते. दरम्यान, लॉजवर पोहोचल्यानंतर विशालनं संबंधित विवाहित महिलेवर बलात्कार केला. यावेळी हे कृत्य करण्यास चौधरीला देविदास आणि रझिया यांनी मदत केली. तसेच त्यांनी पीडित महिलेला जीवेमारण्याची धमकीही दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या तीघाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना २४ मार्च रोजी घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT