Shubham Jadhav_Rapper sakal
पुणे

Rapper Shubham Jadhav : रॅप सॉंग प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत चित्रित केलेल्या वादग्रस्त ‘रॅप सॉंग’ प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत चित्रित केलेल्या वादग्रस्त ‘रॅप सॉंग’ प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत चित्रित केलेल्या वादग्रस्त ‘रॅप सॉंग’ प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, अशा सूचना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात तसेच इमारतीमधील विविध सभागृहांमध्ये वादग्रस्त रॅप सॉंगचे चित्रीकरण करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारीत झाले होते. त्यानंतर आता विद्यापीठाने संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्री मंठाळकर ,आधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या आवारात तसेच सभागृहात मद्याची बाटली, तलवार आणि पिस्तूल घेऊन काही तरुणांनी रॅप सॉंगचे चित्रकरण केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT